एकत्र बसून मोठा नेता कोण ते ठरवा; रोहित पवारांनी विखे-शिंदेंना खिजवले !
Rohit Pawar On Shinde and Vikhe Controversy: राज्यभर गाजलेल्या जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार राम शिंदे यांनी आपल्याच पक्षातील नेते राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनी आमदार रोहित पवारांना मदत केल्याचा शिंदेंनी आरोप केला आहे. त्याला आता रोहित पवारांनी थेट उत्तर देत विखे-शिंदे यांना खिजवले आहे.
Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’; भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर
रोहित पवार म्हणाले, हा भाजपमधील अंतर्गत वाद आहे. विखे व शिंदे या दोघांनी एकत्र बसून त्यांच्यामधील मोठा नेता कोण आहे ते ठरवावे. उगाच माध्यमांसमोर येऊन बातम्या करू नये असा टोलाही पवार यांनी लगावला आहे. मला कोणाचीही मदत झालेली नसल्याचेही रोहित पवारांनी सांगितले.
पटोलेंनी राऊतांना जागा वाटपावरून फटकारले; ‘मविआत अडचणी निर्माण करू नका’
जामखेडमध्ये दबावाचे राजकारण करण्यात आले आहे. यावर योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देईल. भविष्यात मोठ्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी जनता त्यांना मतदानातून उत्तर देईल, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.
आमदार शिंदे यांनी केलेल्या आरोपावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनीही उत्तर दिले आहे. राम शिंदे यांनी विखे-पितांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतरही पुण्यात पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतरही माध्यमांशी बोलताना राम शिंदे यांनी पुन्हा विखेंवर टीका केली आहे.