Rohit Pawar : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा वापर; रोहित पवारांचा आरोप, दादा भुसेंचं प्रत्युत्तर

Rohit Pawar : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा वापर; रोहित पवारांचा आरोप, दादा भुसेंचं प्रत्युत्तर

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मंत्री दादा भूसे हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आज निकाल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवरून एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला. तर त्याल दादा भूसेंनी प्रत्युत्तर दिले.

Deepfake Video : AI द्वारे फेक व्हिडीओ, मोठं-मोठे सेलिब्रेटी अडकले जाळ्यात; तुम्ही सेफ आहात?

काय म्हणाले रोहित पवार?

कोणत्याही पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला असेल. तर ते लोकशाहीसाठी योग्य नाही. हीच सवय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील लागली. तर सामान्य कुटुंबातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी कधीच निवडून येणार नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लोक व्यापक दृष्टीने विचार करत असतात. त्यामुळे आगामी काळात कोणता पक्ष निवडून येणार? याचे गणित ग्रामपंचायतीच्या निकालांवर लावण्यापेक्षा लोकांच्या भावना आणि अडचणी यावर लावले पाहिजे. अस रोहित पवार म्हणाले.

तिघांची बेरीज केली तरी, दुप्पट यश भाजपाला; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

काय म्हणाले दादा भूसे?

तर रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा वापर झाल्याचा केलेला आरोप. हा मतदारांचा अपमान असल्याचं दादा भुसे यांनी म्हटले. मतदार जर पैशांमध्ये विकत घेतले जाऊ शकले असते. तर सामान्य नागरिक निवडून आले असते का? असा प्रश्न मला रोहित पवारांना विचारायचा आहे. तसेच ते देखील निवडून आलेले आहेत तेही पैसे देऊन निवडून आले आहेत का? असं प्रत्युत्तर दादा भुसे यांनी रोहित पवारांना दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube