सांगली : फक्त एक संशय आला अन् राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा काटा काढला…
सांगली : सांगली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल घडली. नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. काल रात्री साडेआठच्या दरम्यान ही खुनाची घटना घडली. यानंतर आरोपी पसार झाले होते. या घटनेने सांगली शहर हादरून गेले होते. दरम्यान, रात्री पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवल्यांतर आज या प्रकणाचा उलगडा झाला. (Sangli NCP activist murder, four arrested by police)
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माने चौकाजवळील परिसरात ही घटना हत्येचा घटना घडली. बुलेटवरून आलेल्या हल्लेखोरांनी मुल्ला याच्यावर आठ गोळ्या झाडल्या. तसेच धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून मुल्ला यांच्या घरातील व आजूबाजूचे लोक धावले. तेव्हा मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपींनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालसाब मुल्ला हा कुख्यात मोका टोळीचा गुन्हेगार आणि खाजगी सावकार मुश्ताक मुल्ला याचा भाऊ होता. मृत नलसाबवर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शहरातील मध्यवस्थीतील महावीर कॉलनीतील युवकाचा खून झाला होता. शंभरफुटी रस्त्यावरील जॉय ग्रुप या टोळीतील अकरा जणांवर तीन वर्षांपूर्वी मोका लावला होता. त्यात याचा समावेश होता, सध्या तो जामिनावर बाहेर होता. तो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करत होता. नालसाब मुल्ला हा मोक्का कारागृहात बंद असलेल्या सचिन डोंगरे या गुन्हेगाराला जामीन होऊ नये आणि त्याला बाहेर येता येऊ नये, यसाठी प्रयत्न करत होता. याच कारणातून त्याची हत्या झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या हत्ये प्रकरणी आज पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर 1 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. सनी कुरणे (वय 23), विशाल कोळपे (वय 20), स्वप्नील मलमे (वय 20) अशी तीन आरोपींची नावे आहेत. मुल्ला यांच्या छातीवर आणि पोटावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्यांच्यासोबत आणखी दोघे असावेत असा संशय आहे.