शरद पवारांनी आठवण काढलेले पैलवान मारुती माने कोण? कसे झाले सांगलीचे खासदार?

शरद पवारांनी आठवण काढलेले पैलवान मारुती माने कोण? कसे झाले सांगलीचे खासदार?

Sharad Pawar On MP Maruti Mane : आज सांगलीत चंद्रहार पाटील यांचा प्रचार करताना शरद पवारांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर झालेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. तसंच, पवारांनी यावेळी बोलताना मारुती माने या पैलवान व्यक्तीची आठवण काढून तेही या जिल्ह्याचे खासदार होते. त्यामुळे हे कुस्ती खेळणारे लोकसभेत जाऊन काय करणार? असा प्रश्न विचारणाऱ्यांना पवारांनी चांगलच उत्तर दिलं आहे.

 

शरद पवारांनी आठवण काढलेले मारुती माने कोण होते?

वयाच्या आठव्या वर्षी अंगाला लाल माती लाऊन कुस्तीच्या फडात उतरेले मारुती मानेंनी दिल्लीही गाजवली. मारुती माने यांचं मुळ गाव मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान. त्यांनी कवठेपिरान गावाचं नावं दिल्लीतच नाही तर ऑलम्पिक, आशियायी गेम्सपर्यंत पोहचवलं. दरम्यान, गावातले सगळे निर्णय मारुती मानेंकडेच असायचे. माने यांना गावकऱ्यांनी सरपंच बनवलं. ते सलग पंचवीस वर्षे सरपंच होते. पुढे ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.

 

राजीव गांधींचा दौरा होता

सांगली दौऱ्यात राजीव गांधी यांचं भाषण झालं. त्यावेळी धिप्पाड शरीर, साडेदहा फुट उंची, डोक्यावर फेटा, अंगात धोतर अशा पोशाखात असलेले मारुती माने हाताची घडी घालून समोर बसले होते. त्यांच्याकडे राजीव गांधींच लक्ष गेलं. त्यावर राजीव गांधी यांनी आपल्या पी.ए’कडे चौकशी केली. त्यावर पीएने सांगितलं “येही तो है मारुती माने जिल्होंने भारतको कुश्ती में सुवर्ण पदक दिलाया’. याचवेळी सांगलीतून राज्यसभेसाठी एक खासदार निवडला जाणार अशी चर्चा होती.

 

संसदेत प्रश्न विचारला अन् हशा पिकला

पुढे मारुती माने यांना काँग्रेसने राज्यसभेच खासदार केलं. त्यावेळी कुस्तीतले सगळे डाव माहित असणाऱ्या मारुती माने यांना राजकारणातले मात्र काही डाव माहित नव्हते. दरम्यान, ते जास्त राज्यसभेत बोलत नव्हते. त्यांनी एकदा संसदेत ओरिसाच्या आदिवासींच्या प्रश्नाची चर्चा सुरू असताना मारुती माने यांनी जम्मू ते पुणे चालणारी झेलम एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत आणली जावी अशी मागणी केली. या प्रश्वनावर सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. माने नवीन असल्याने त्यांचा प्रश्न विचारण्यात गोंधळ झाला होता. परंतु, जनतेच्या प्रश्नांना त्यांनी नेहमी वाचा फोडली. याच मारुती माने यांची आठवण काढून शरद पवार यांनी महाविकास आघाडीने चंद्रहार पाटलांना दिलेल्या उमेदवारीचं समर्थन केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज