Ahmednagar News : शहरात सुविधांचा बोजवारा; शिवसेनेकडून आयुक्तांना कंदील भेट देऊन निषेध…

Vikram Rathod News

Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा आहे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून जीवघेणा हल्ला, हत्या घडल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर आता शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने शिवेसेनेच्यावतीने (ठाकरे गट) महापालिकेच्या आयुक्तांना थेट कंदीलच भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…

अहमदनगर शहरातील सावेडी इथल्या प्रोफेसर चौाकत अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. हे पथदिवे सुरु करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने आयुक्तांकडे निवेदनासह कंदील भेट देऊन करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…

सावेडीमधील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या प्रोफेसर चौकात जाणून बुजून दिवे बंद ठेवण्यात आले आहेत. याच भागात नगर आकाशवाणी, तहसील कार्यालय, मनपा प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्र, तोफखाना पोलिस ठाणे, याच रस्त्यावर असल्याने या भागात रात्रीच्या वेळी मोठी गर्दी होत असते त्यामुळे या भागातील दिवे तत्काळ सुरु करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, एकीकडे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी बायपास, सीना नदी पूल, माळीवाडा बसस्थानक यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे महानगरपालिका किरकोळ काही लाखांचे कामेही पूर्णत्वास नेत नसल्याने नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Tags

follow us