नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच ठार
Accident On Nagar-Kalyan Highway : दिवसेंदिवस अपघात (accident) होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. आताही अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला. नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वडगाव आनंद गावच्या हद्दीत टेम्पो ट्रॅव्हल्स बसने मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळं मोटार सायकलवरील तीनजण जागीच ठार झाले. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. (Terrible accident on Nagar-Kalyan highway, 3 laborers killed)
पोलिसांनी दिलेलल्या माहितीनुसार, योगेश रामकुमार (वय 21), चाहत बाबुराव (वय 17), संजीव कुमार (वय 24, सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले हे तिन्ही मृत तरुण आपल्या चरितार्थासाठी आळेफाटा येथील एका खासगी बेकरीमध्ये मजूर म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे काम करून बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच मोटारसायकलवरून जेवणासाठी गेले होते.
हिमाचल-कर्नाटक जिंकलं; आता ‘या’ राज्यांत प्रियंका गांधींचे कँपेन पॉलिटिक्स!
मोटार सायकलवरून जेवायला जात असतांना वडगाव आनंद गावच्या हद्दीतील चौघुले वस्तीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने (एमएच 04 एचवाय 8730) त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटार सायकलवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बेकरीमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या तीन मृतांमध्ये एका अल्पवयीन मजुराचाही समावेश आहे.
ही अपघाताची घटना घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला कळवली. ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तसेच महामार्गावर झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वातूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.