नाशिक पदवीधरसाठी जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान

नाशिक पदवीधरसाठी जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान

अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

येत्या 2 फेब्रुवारी रोजी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याचंही निवडणूक शाखेमार्फत सांगण्यात आलंय.

दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पाहाणी केली होती.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमदेवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी भरल्याने नवा ट्विस्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला. तर दुसरीकडे भाजपकडून उमदेवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती समोर आली होती.

सुधीर तांबे यांनी काँग्रेसशी दगाफटका केल्याचा आरोप ठेवत महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. असं असतानाही आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचं सत्यजित तांबेंकडून सांगण्यात येत होते.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्या खरी लढत होणार असून ही लढत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube