स्मायलिंग अस्मितामुळे चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आला; शहाजीराजेंचं विधान

  • Written By: Published:
स्मायलिंग अस्मितामुळे चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आला; शहाजीराजेंचं विधान

अहमदनगर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा (Chhatrapati IV Shivaji Maharaj) मागे पडलेला इतिहास पुढे आणण्यासाठी अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्याला चौथे शिवाजी महाराजांचे नाव द्यावे यासाठी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीने प्रयत्न केला. आता लवकरच जिल्ह्यात त्यांच्या नावे एक शाळा व महाविद्यालय असेल असा विश्वास युवराज शहाजीराजे छत्रपती (Shahaji Raje Chhatrapati) यांनी व्यक्त केला.

आज दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दिल्लीगेट ते पत्रकार चौक या रस्त्याचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण झाले. या नामकरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहाजीराजे यांनी स्मारकातील चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही शहाजीराजे म्हणाले. यावेळी स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी प्रास्ताविकातून भविष्यातील कामांची माहिती दिली. सर्वांनी सहकार्य केले तर भारतातील पहिले आदर्श स्मारक अहमदनगरला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘शेवटी चीनचा खरा नकाशा सापडला’; मनोज नरवणेंकडून फोटो ट्विट…

दरम्यान सभापती गणेशराव कवडे यांनी सदरील ऐतिहासिक कामाची संधी मिळाली याचा अभिमान आहे, असं सांगितलं. तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील लवकरच मोठा निधी पुढील विकास कामासाठी सरकारकडून घेऊ व आणखी मोठ्या प्रमाणावर काम उभे करू असा विश्वास व्यक्त केला.

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभातपी गणेशराव कवडे यांना निवदेन दिले होते. यात आरक्षणाचे जनक शाहू महाराजांच्या वडिलांचा इतिहास पुढे आणण्यासाठी दिल्ली गेट ते पत्रकार चौक या शहरातील मुख्य रस्त्याला छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. दरम्यान, आज या रस्त्याचे नामकरण झाले.

या कार्यक्रमाला माजी महापौर शीला शिंदे, नगरसेवक विनीत पाउलबुधे, डॉ सागर बोरूडे, निखिल वारे, जिजाऊ ब्रिगेडच्या संपुर्णा सावंत पद्मा गांगर्डे, अनुराधा येवले,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत वरकड यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी दोन आठवडे रिनुल नागवडे, सिध्दीता दरेकर,पुजा गांगर्डे, विनीत गाडे,धिरज कुमटकर, सचिन सापते, प्रविण गांगर्डे आदींनी परिश्रम घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube