ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा झाली डिजिटल

ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा झाली डिजिटल

अहमदनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल (मंगळवारी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या शाळेला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया, निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगरचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी बोलतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ठ कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करू शकतात, हे मी प्रथमच पाहत आहे. शहरातील शाळांना लाजवेल असा सोहळा आहे. ही प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर जीवनविषयक शिक्षण देते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी येथील शिक्षक प्रयत्न करतात, ही कौतुकाची बाब आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

हनुमाननगर (भारजवाडी) शाळेतील मुलांचे सुंदर हस्ताक्षर व गुणवत्ता पाहून मिशन आपुलकी अंतर्गत निरंजन सेवाभावी संस्था व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त मदतीतून या शाळेला सोलर पॅनल व संगणक कक्ष बहाल करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारजवाडी गावचे सरपंच माणिक भाऊ बटुळे होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले. रंगीबेरंगी मंडप ,आकर्षक रांगोळी, सुबक फलक लेखनाने पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी उद्घाटक आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया यांचे औक्षण करून स्वागत केले, तर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा व गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांचे स्वागत केले. या प्रमुखांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी निरंजनचे अध्यक्ष अतुल डागा यांनी यांनी सांगितले की, बहुतांश शाळांमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. तरीही ग्रामीण भागातील गुणवत्तेत कुठेही मागे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, आणि मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संगणक कक्ष भेट दिला. आमची मदत योग्य ठिकाणी पोहोचली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

राऊतांच्या ‘त्या’ विधानाशी अजित पवारही असहमत; म्हणाले, ‘हा विधिमंडळाचा अपमान…’

या कार्यक्रमासाठी सर्पराज्ञी प्रकल्पचे संचालक तथा प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे, बालहक्क समितीचे समीर पठाण, पत्रकार गोकुळ पवार, अंगद पानसंबळ, सतीश मुरकुटे, जीवन कदम, राघू जपकर सर, पांडुरंग बटुळे, किरण मणियार, स्वप्नील कुलकर्णी, मुकुंद धूत, विशाल झवर, सुहास चांडक, सुमित चांडक, प्राजक्ता डागा, सविता झवर, कृष्णा धूत, दिनेश अपूर्वा, पत्रकार बोरा मॅडम आदींसह पालक आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्थक बटुळे या विद्यार्थ्याने केले मुख्याध्यापक लहू बोराटे यांनी आभार मानले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube