शिवसेना ठाकरेंचे खासदार वेगळ गट स्थापन करणार?, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची (Thackeray) जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचीही जोरदार चर्चा आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार?, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?
दरम्यान, या घडामोडींमुळं ठाकरे गटात हालचाली वाढल्या असून, संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य पक्षांतरामुळं शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, पाच खासदार आले म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत आणि तेच राहतील. तसंच ‘ऑपरेशन टायगर’बाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगत त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.