Shiv Sena Symbol : उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला, पक्ष प्रमुखपद घटनाबाह्य; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Symbol : उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला, पक्ष प्रमुखपद घटनाबाह्य; शिंदे गटाचा दावा

नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) कुणाची?, या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे (Election Commission) सुनावणी होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता.

त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. शेवटच्या काही मिनिटात शिंदे गटाच्या वकीलांनी निवडणूक आयोगात लेखी म्हणणं सादर केले.

आज सायंकाळी पाचपर्यंत उत्तर सादर करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश होते. त्यानुसार, मुदतीला एक मिनिट शिल्लक असताना शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर केले. तत्पूर्वी ठाकरे गटाने आपले लेखी उत्तर आधीच सादर केले होते.

शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्देः
■ उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला. पक्ष प्रमुख पद घटनाबाह्य आहे
■ मतांच्या टक्केवारीवर पक्षाची मान्यता असते. आमदार-खासदार जास्त असलेल्या गटाला पक्ष चिन्ह द्यावे.
■ प्रतिनिधी सभा नव्हे तर लोकप्रतिनिधी महत्त्वाचे. सादिक अली केसमधून स्पष्ट
■ केंद्रीय निवडणूक आयोगात लेखी उत्तर सादर केले. त्यात मुळ पक्ष आम्हीच आहोत असा दावा करण्यात आला.
■ एकनाथ शिंदेंची निवड लोकशाही पद्धतीने झाले. एकनाथ शिंदे यांचे पद घटनात्मक आहे.
■ पक्ष लोकप्रतिनिधींचे संख्याबळ जास्त आहे. बहुमत, संख्याबळ विचारात घ्यावे.
■ धनुष्यबाण चिन्हासाठी आम्ही पुराव्याची पुर्तता केली आहे.
■ मुळ पक्ष आमचाच आहे. आम्हाला पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube