Rohit Pawar: रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; महाराष्ट्र दौऱ्यातून चाचपणी?

Rohit Pawar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार चर्चेत आहे. रोहित पवार शेतकरी, विद्यार्थींच्या मुद्द्यावरुन

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Rohit Pawar

Rohit Pawar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार चर्चेत आहे. रोहित पवार शेतकरी, विद्यार्थींच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता रोहित पवार हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांसाठी मोर्चा देखील काढणार आहे मात्र या मोर्च्यात सहभागी होऊ नका असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर दुसरीकडे रोहित पवार देखील काही मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असून त्यांनी महाराष्ट्र दौऱ्यातून मोठी चाचपणी केल्याची देखील माहिती समोर येत आहे.

जर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एनडीएसोबत (NDA) जाण्याचा निर्णय घेतला तर रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे असा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. सूत्रानुसार, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्ष नेतृत्त्वाला विश्वासात न घेता विदर्भासह राज्याच्या इतर भागात चाचपणी केली आहे. काँग्रेसमध्ये गेल्यास किंवा वेगळी भुमिका घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCPSP) कोण किती नेते आपल्यासोबत येणार यासाठी रोहित पवार यांनी विदर्भासह राज्यातील इतर भागात चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवार यांच्याकडून गेल्या काही दिवसात सरकारविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे मात्र यावेळी त्यांनी पक्षाचा चिन्हा किंवा वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरले नसल्याने रोहित पवार पुढील काही दिवसात मोठा निर्णय घेणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

जे कार्यकर्ते, स्थानिक नेते, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी भाजपसोबत जाण्यास तयार नाही असे नेते रोहित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांच्या टीमकडून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणासह विविध जिल्ह्यात चाचपणी करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेचा थेट महापौरांना चिमटा; फ्लेक्सवरून मिश्किल टोला-

तर दुसरीकडे आत मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे. या बैठकीत रोहित पवार यांच्याबाबत काही निर्णय घेण्यात येणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us