शिक्षकांच्या बदल्या थांबणार?; शिक्षणमंत्री केसरकरांचं मोठं वक्तव्य
राज्यातल्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या बदल्या थांबणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या कशा थांबल्या जातील, याबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त केसरकर आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यातील फक्त सरकारी शाळांमधील शिक्षकांच्याच बदल्या होत असतात. माध्यमिक शाळांमधील शिक्षक आयुष्यभर एकाच शाळेत शिकवून समाजात चांगल्या दर्जाचे विद्यार्थी घडवत असतात. सरकारी शाळांच्या बदल्या होणं योग्य आहे की अयोग्य याबाबत आम्ही विचार करीत असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे.
Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज
तसेच मी शिक्षकांच्या बदल्या होणारच नाहीत, अशी घोषणा केलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रात मोठी शिक्षक भरती करीत असताना शिक्षकांच्या बदल्या कशा थांबतील, यासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुढे बोलताना केसरकर म्हणाले, राज्यात जून महिन्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे लागू होणार? यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्या वर्षीच पूर्णपणे लागू होऊ शकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच केंद्र सरकारने ज्या विषयात राज्य सरकारला स्वातंत्र्य दिले आहे.
त्या विषयांतील पाठ्यपुस्तकांची निर्मिती धोरणानुसार करण्याबाबत विचार सुरू असून खासगी शाळा वगळता पूर्व प्राथमिक शिक्षणात एकरूपता नाही. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणात एकरूपता आणण्याबाबत चर्चा सुरू असून या टप्प्यापासूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, पुढील काळात शिक्षण हे बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारे असणार नाही. तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे शिक्षण असणार आहेत. प्रत्येकजण काय डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकणार नाही. तर व्यावसायिक शिक्षण दिल्यास हे विद्यार्थी जगाचे नेतृत्व करू शकतील, परंतु हे खूप क्लिष्ट काम असून त्यादिशेने काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.