RTE Admission : पहिली ते आठवी मोफत शिक्षण, आजपासून प्रवेशाला सुरुवात

RTE Admission : पहिली ते आठवी मोफत शिक्षण, आजपासून प्रवेशाला सुरुवात

मुंबई : पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आहे. पालक अनेक दिवसांपासून आरटीई प्रवेशाच्या निर्णयाची वाट बघत होते. प्राथमिक शिक्षण (primary education) संचलाकांनी एक परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत खासगी प्राथमिक शाळांमधील 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकामधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जातीय.

आरटीई ऑनलाईन (rte admission) प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्जासाठी अंतिम मुदत 17 मार्च आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1,926 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत.

IND vs AUS, LIVE Score : टीम इंडियाची अवस्था बिकट, इंडियाने गमावले ५ विकेट्स

खाजगी शाळांची फी सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर असते. सरकारच्या निर्णयामुळे दुर्बल घटकातील मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयानुसार 17 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत.

पालक किंवा पाल्य राहत असलेल्या एक किलोमीटरच्या अंतर्गत शाळा असेल आणि ती शाळा खाजगी असेल तर तो आरटीई अंतर्गत अर्ज करु शकतो. त्या विद्यार्थ्याने केलेला अर्ज स्विकारणे शाळेसाठी बंधनकारक असते. काही ठराविक शाळा यासाठी निवडल्या जातात. त्यांना ठराविक जागा राखीव ठेवणे बंधनकारक असते. इतर मुलांप्रमाणे दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणांची संधी उपलब्ध करुन देणं हाच या निर्णयाचा उद्देश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube