IND vs AUS, LIVE Score : टीम इंडियाची अवस्था बिकट, अर्धासंघ तंबूत परतला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T113221.458

इंदूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात आहे. (IND vs AUS 3rd Test) पहिल्या दोन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत २-० अशी आघाडी मिळवली. (IND vs AUS LIVE Score ) या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात बदल करण्यात आले आहेत.

विराट कोहली ने टॉड मर्फी ला LBW बाद केले. कुहनेमनच्या चेंडूवर श्रेयस अय्यर खाते न उघडताच क्लीन बोल्ड झाला. भारताची चौथी विकेट, भारत ४ बाद ४४ धावा केल्या, तर लायनने ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कुहनेमनने त्याला झेलबाद केले. पुजारा क्लीन बोल्ड, भारत – ३ बाद ३६ धावा केल्या, लायनच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लायनने पुजाराला क्लीन बोल्ड करत आऊट केले.

IND vs AUS 3rd Test : आजपासून इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच

भारताला दुसरा धक्का बसला. कुहनेमनच्या आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गिल स्मिथकडून झेलबाद झाला. गिलने २१ चेंडूत १८ धावा केल्या. भारताला पहिला झटका, भारत – १ बाद २७ धावा करण्यात आल्या, कुहनेमनच्या सहाव्या शतकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला कॅरीने स्टंपिंग करत बाद केले. ५ षटकांनंतर, भारत – बिनबाद २६ धावा करण्यात आल्या. तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सलामी जोडी मैदानात उतरली आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून संघात परतलेला स्टार्क पहिली गोलंदाजी करत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube