8 महिला पोलिसांवर उपायुक्त आणि दोन निरीक्षकांकडून बलात्कार, मुंबई पोलीस दलात खळबळ

8 महिला पोलिसांवर उपायुक्त आणि दोन निरीक्षकांकडून बलात्कार, मुंबई पोलीस दलात खळबळ

मुंबई : पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस भक्षक झाले तर? अशीच एक खळबळजनक घटना मुंबई पोली दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून (Nagpada Motor Transport Department)समोर आली. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलिस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी अनेक दिवसांसून बलात्कार करत असल्याचा आरोप केला. या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Raid 2: ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; अजय देवगणच्या ‘रेड 2’ च्या शूटिंगला सुरुवात

मुंबईतील मोटार वाहन विभागात कार्यरत असलेल्या आठ महिला पोलिस शिपायांनी उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षकांनी बलात्काराचा केल्याचा आरोप केला आहे. या महिलांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आले असून पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आमची युती आधीचीच, आता वंचित महाविकास आघाडीचा घटक ; संजय राऊत स्पष्टच बोलले 

या संबंधातून या शिपायी महिला गर्भवती राहिल्याने त्यांना जबरदस्तीने गर्भात देखील करायला भाग पाडण्यात आलं. यासोबतच या अधिकाऱ्यांनी शरीर संबंध ठेवतांनाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामुहहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रात केला आहे. दोन पोलिस निरीक्षक आणि उपायुक्तांनी त्यांना सरकारी वाहनातून त्यांच्या रुमवर नेऊन वारंवार बलात्कार केला. लेखनिका, उपायुक्तांचा ऑपरेटर, चालक ऑर्डरली यांनीही त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिला पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले असून प्रत्येकी सात हजार रुपये उपायुक्तांच्या आदेशावरन देऊन या प्रकरणाची वाच्यता करू नये, अशीही धमकीही दिली. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

या सगळ्याविरोधात आम्ही एकत्र आवाज उठवल्यावर आमची बदली करण्यात आली. आम्ही शेतकरी कुटुंबातील असून आमचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पीडितांनी केली.

या तिन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त करून चौकशी करण्यात यावी, त्यांना बडतर्फ करून कठोर कारवाई करण्यात यावी. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्महत्या करू, असा इशाराही या पीडितांनी दिली.

दरम्यान, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी याबाबत बोलणे टाळत आहेत. मात्र, बदल्या आणि पदोन्नतीवरून निर्माण झालेल्या गटबाजीमुळे हे आरोप करण्यात आल्याची पोलीस दलात कुजबूज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube