Online Scam : 25 प्लेट समोसे पडले दीड लाख रुपयांना… मुंबईतील डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

Online Scam : 25 प्लेट समोसे पडले दीड लाख रुपयांना… मुंबईतील डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई : फिरायला जाताना 25 प्लेट समोसे घेणं हे एका डॉक्टरला प्रचंड महागात पडलं आहे. मुंबईतील एका डॉक्टरचे ऑनलाईन समोसे ऑर्डर केल्यानंतर दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणानंतर सायबर सिक्युरीटीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने बँक अकाऊंट गोठवले आहे. (A 27-year-old doctor fell victim to fraud and lost Rs 1.40 lakh after placing an order for 25 plates of samosas)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी मुंबीतील केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरांचे कर्जतला त्यांच्या मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचे नियोजन ठरले. शनिवारी रात्री 8.30 वाजता डॉक्टरांनी वाटेत जाताना खायला म्हणून समोसे ऑर्डर करण्याचे ठरवले. ऑर्डर करण्यापूर्वी त्यांनी गुगलवरुन एक नंबर शोधला आणि त्यावरुन फोन केला. 25 प्लेट समोस्यांसाठी त्यांना 1500 रुपये बिल सांगण्यात आले. याबाबत त्यांना व्हॉट्सअॅपवरती पेमेंटसाठी पर्याय देण्यात आला.

अजितदादांसोबत गेलेल्या संजयमामांना टक्कर देणार पवारांचा शिलेदार; मोठी शक्ती उभी करण्याचा निर्धार

यात बँक अकाऊंट नंबर आणि इतर माहितीसह पैसे देण्यास सांगितले. डॉक्टरांनी संबंधित दुकानदाराला 1500 रुपयेही दिले. मात्र, पाठवल्यानंतर transaction ID तयार करण्यास सांगण्यात आले. समोर सांगितल्यानुसार डॉक्टर कृती करत गेले. यानंतर अचानक त्यांच्या खात्यातून 28 हजार रुपये कापले गेले. त्यानंतर त्यांना आणखी दोन-तीन मेसेज आले.

या दरम्यान डॉक्टरांनी लगेच त्यांचे खाते ब्लॉक केले, मात्र तोपर्यंत ऑनलाईन स्कॅम झाला होता आणि त्यांच्या खात्यातून 1.40 लाख रुपये काढून घेतले होते. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. पण 25 प्लेट्स समोस्यांसाठी 1.40 लाख रुपये मोजावे लागतील असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.

‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य

समोसा हा बहुतांश लोकांचा आवडता नाश्ता मानला जातो. लोकांना अनेकदा चहासोबत समोसे खायला आवडतात. समोसा हे आपल्या देशात खाल्ला जाणारा सर्वात प्रसिद्ध आणि स्वस्त फास्ट फूड आहे. क्वचितच कोणी असेल ज्याने समोश्याची चव चाखली नसेल. आपल्या देशात समोशाची किंमतही खूप कमी आहे. आजही अनेक छोट्या शहरांमध्ये समोशाची किंमत फक्त पाच रुपये आहे. पण हाच समोसा या डॉक्टरला दिड लाखाला पडला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube