‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्या संदर्भात बोलताना महिलांचा अवमान होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.
‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर शिंदे गटातील काही आमदारांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये गोगावले यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रिपदासोबत आपल्याला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणारच, असे गोगावले ठणकावून सांगत होते. मात्र, राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या अन् अजित पवार आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्याबरोबरील आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली.
या घडामोडींमुळे शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता प्रचंड वाढली. अदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळेल की काय अशीही शक्यता निर्माण झाली. तरी देखील भरत गोगावले मंत्रीपदावरील दावा सोडायला तयार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकलं निर्मला सीतारमण यांचं अर्थ मंत्रालय; पाकिस्तानला शेअर झाली गोपनीय माहिती?
प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मात्र त्यांचा तोल सुटल्याचे दिसून आले. गोगावले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगडच्या मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोगावले म्हणाले, पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का?, आम्ही त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा तरी फरक येतो ना. मला आमदारकीचा 15 वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सहाच्या सहा आमदार आमची सगळ्यांची एकच मागणी आहे रायगडचा पालकमंत्री भरतशेठ, असे गोगावले यांनी म्हटले. मात्र, बोलताना भरत गोगावले यांनी नकळतपणे महिला आणि पुरुष भेदभाव करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.