ढिगाऱ्याखाली अडकले 50 ते 60 जीव, दोन जणांचा मृत्यू
Bhiwandi Building Collaps: भिवंडीतील वलपाडा परिसरात आज दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती आहे. 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत दोन जाणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफ, पोलीस पथक बाचाव कार्य करत आहेत.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर या विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 ते 60 जण अडकले आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि दोन मजले अशी इमारत होती.
आज दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. वलपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात 30 हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यावर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात 75 हजार झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमींचे चिपको आंदोलन
एनडीआरएफकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत इमारतीत अडकलेल्या 12 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये 2 दोन जाणांचा मृत्यू झाला आहे. इमारत कशामुळे कोसळली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या येथे मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेले जात आहे.