मुंबईत प्रत्येकाला मराठी आलच पाहिजे असं काही नाही; भैय्या जोशींची जीभ घसरली

मुंबईत प्रत्येकाला मराठी आलच पाहिजे असं काही नाही; भैय्या जोशींची जीभ घसरली

Bhaiyya Joshi strange Statement on Marathi Language : मुंबईमधील विद्याविहार या ठिकाणी एक कार्यक्रम पार पाडला यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईतील विविधतेमधील एकता यावर एक वक्तव्य केलं. मात्र या दरम्यान मराठी भाषेवर बोलातना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदेंनी प्रवेशाची ऑफर दिली.. अटी, शर्तींवर अडलंय? धंगेकरांनी सगळंच सांगितलं

यावेळी बोलताना जोशी म्हणाले की मुंबईमध्ये विविध राज्य आणि प्रांतामधील भाषा बोलणारे नागरिक राहतात तिथे अनेक भाषा आहेत जशी घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलच पाहिजे असं नाही. दरम्यान या कार्यक्रमाला मंत्रिम मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते त्यांच्या समक्ष जोशी यांनी हे वक्तव्य केले आहे त्यामुळे आता या वक्तव्यावर राज्यसह राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमरतात हे पहाणे महत्त्वाचे असेल.

एकनाथ शिंदेंनी प्रवेशाची ऑफर दिली.. अटी, शर्तींवर अडलंय? धंगेकरांनी सगळंच सांगितलं

दुसरीकडे नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज ठाकरे यांच्या पक्षाकडून नेहमीच महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी बोलण्याचा आग्रह धरला जातो दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या यासाठी ते आग्रही असल्याचे दिसतात तसेच शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असावा अशी ही मागणी त्यांच्याकडून केली जाते मात्र त्यादरम्यान आता जोशी यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत विरोधाभासच असल्याने यावर टीकेची जोड उठणार एवढं नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube