रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत भाजपचा हस्तक्षेप ; राष्ट्रवादीकडून तीव्र निदर्शने…

रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत भाजपचा हस्तक्षेप ; राष्ट्रवादीकडून तीव्र निदर्शने…

पुणे : पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

या निविदेतील अटी व शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिका-यांची चौकशी करावी या मागणीसाठी आज (ता. 20 जानेवारी) पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे.

यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनास पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह माजी नगरसेवक, राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube