शिडीचा वापर करत चोर सैफच्या घरी; पोलीस तपासात मिळाली महत्वाची माहिती

शिडीचा वापर करत चोर सैफच्या घरी; पोलीस तपासात मिळाली महत्वाची माहिती

Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर चाकू (Saif Ali Khan) हल्ला झाला. चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी त्याच्या घरात घुसला आणि सैफवर सपासप वार केले. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या (Mumbai Police) प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासात आतापर्यंत काय समोर आलं याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे आमच्या तपासातून पुढे आले आहे, अशी माहिती डिसीपी दिक्षित गेडाम यांनी दिली.

मोठी बातमी! सैफकडे काम करणारे तिघेजण ताब्यात; सात पथकांकडून तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी सैफच्या घरातील मोलकरणीवर हल्ला झाला. या हल्ल्यात मोलकरीण किरकोळ जखमी झाली. वाद ऐकून सैफ तिथे आला. त्याने हल्लेखोराला समजावण्याचा त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोर चिडला आणि त्याने रागाच्या भरात सैफवर हातातील धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी दोघांत झटापटही झाली.

या हल्ल्यात सैफवर एकूण सहा जखमा झाल्या आहेत. मानेवरील जखम दहा सेंटीमीटर खोल आहे. तर दुसरी जखम पाठीच्या मणक्याजवळ झाली आहे. या दोन्ही जखमा गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातून टोकदार वस्तू बाहेर काढण्यात आल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. आता सैफ धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

जीवाची पर्वा न करता तैमुर खानसाठी ढाल बनली सैफची मोलकरीण!

काल सैफ अली खानच्या घरी जी घटना घडली आहे या घटनेत एक जणाने इमारतीत प्रवेश केला. नंतर जिन्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश मिळवल्याचं तपासात समोर आलं आहे. त्या संशयितांची माहिती आमच्याकडे आली आहे. त्याला अटक करण्यासाठी दहा पथके रवाना करण्यात आली आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. आतापर्यंतच्या तपासात आरोपीने चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे असे दिक्षीत गेडाम म्हणाले.

सैफच्या पीआर टीमचं निवेदन

सैफ अली खानच्या पीआर टीमनेही या घटनेबाबत एक निवेदन दिलं आहे. यानुसार सैफच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिडिया आणि चाहत्यांनी संयम बाळगावा. हा प्रकार पोलीस केस आहे. आम्ही आपलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती देत राहू असे पीआर टीमने म्हटले आहे. करिना कपूरच्या पीआर टीमनेही निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube