आमदार लक्ष्मण जगताप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

आमदार लक्ष्मण जगताप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिलीय. तडफदार नेतृत्व काळाने हिरावले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला, असं म्हंटलंय.

तसेच आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

तर फडणवीस म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते.

आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवल्याची आठवण यावेळी त्यांनी सांगितली आहे.

दरम्यान, आम्ही सर्व जगताप कुटुंबियांच्यासोबत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं असून यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनीदेखील दिवंगत जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube