CM Eknath Shinde : ‘ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी समिती स्थापन, दोषींवर कारवाई करणार’
Thane Hospital News : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेप्रकरणी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या मृत्यूप्रकरणी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची माहिती दिली. (CM Eknath Shinde on thane hospital death they said A committee was appointed under the chairmanship of the Director of Health)
आज माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी या प्रकरणाची सकाळीच आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. आणि आरोग्य विभागाला सुचना दिल्या आहेत. आमचे मंत्री दीपक केसरकरही तिथे पोहोचले असावेत. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सतत संपर्कात होते. रुग्णालयात वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा जो काही अहवाल येईल, त्या अहवालानुसार कारवाई केली जाईल. ही घटना दुर्दैवी असून तातडीने निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
17 रुग्णांचा मृत्यू; ‘डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर लाथा मारुन हाकलून द्या’, आव्हाडांचा संताप
दोन दिवसांपूर्वी देखील पाच जणांचा याच रुग्णालयात मृत्यू झाला होता. यावर बोलतांना सीएम शिंदे म्हणाले, या संदर्भात मला आयुक्तांनी वस्सुस्थिती सांगितली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण आले होते. यातील काही रुग्ण खासगी रुग्णालयातूनही आले होते. त्यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं होतं. ह्या सर्व बाबी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. मात्र, ही घटना दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, आणि अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात आरोग्य संचालक, महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णावर आधीच्या रुग्णालयात नेमके काय उपचार झाले आणि येथे आल्यानंतर त्याची स्थिती काय होती? येथे त्याच्यावर कोणते उपचार केले गेले? याची सविस्तर चौकशी केली जाईल, असं पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितलं. यांनी सांगितलं.
विरोधकांची टीका-
या घटनेमुळं विरोधकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जयतं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव आहे असल्याची टीका केली. तर तर गेल्या काही दिवसांपूर्वीच 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचं शरद पवार म्हणाले.