मंत्रालयातील कँटिंग दिव्यांग कक्षाकडे पाठ,सुविधांच्या अभावामुळे दिव्यांग नाराजी…

Mantralaya--मंत्रालयातील मुख्य कँटीन तळमजल्यावर असल्याने दिव्यांग नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र दिव्यांग कक्ष तयार केले आहे.

Mantralya 1

मुंबई : प्रशांत गोडसे, प्रतिनिधी-राज्यभरातून दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी मंत्रालयात येत असतात. मंत्रालय परिसरात सुरक्षा कारणास्तव पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी नसल्याने नागरिकांचा आधार मुख्यतः मंत्रालयातील (Mantralaya) कँटीनवरच असतो. नाश्ता आणि जेवणासाठी दिवसभर कँटीनमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

मंत्रालयातील मुख्य कँटीन तळमजल्यावर असल्याने दिव्यांग नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र दिव्यांग कक्ष तयार केले आहे. मात्र प्रत्यक्षात या कक्षाकडेच दिव्यांग (disabled) बांधवांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. कारण या कक्षात आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याची दिव्यांगांकडून सांगण्यात येत आहे. कक्षात बसण्याची पुरेशी व्यवस्था नसणे, स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी असणे. सर्वात महत्वाचे म्हणजे कक्षात व्हेंटिनटीलेशन कुठलीही व्यवस्था नाही, खेळती हवा हा प्रकारच दिसत नाही. दाखवायचे म्हणून नावाला कक्ष उभारले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक बंदिस्त खोली गरज पडल्यास स्टोअर रूम म्हणून त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे.तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसल्याने अनेक दिव्यांग नागरिक या कक्षाचा वापर टाळत असल्याचे सांगितले जात आहे. काहींनी तर “स्वतंत्र कक्ष तयार केला, मात्र त्यामध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली व्यवस्था आणि सुविधा दिसत नसल्याचे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे .

माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की मी सदर कक्षाला भेट देऊन प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन मंत्रालय परिसर, प्रवेश आणि इतर दिव्यांग बांधवांसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे. त्या सर्व गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील.

लेट्सअप मराठीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता लवकरच सदर दिव्यांग कक्ष वातानुकुलीत करत असून त्यातील ज्या ज्या त्रुटी असतील त्या लवकरच पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्रालयात येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि सुविधा-संपन्न व्यवस्था उभारण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. केवळ स्वतंत्र कक्ष निर्माण करून उपयोग नसून, त्या ठिकाणी प्रत्यक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

follow us