ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज!

  • Written By: Last Updated:
ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज!

मुंबई :’सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता अखेर संपली आहे. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं टिझरवरून दिसतंय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टिझरमधले संवाद आणि पार्श्वसंगीत हे अत्यंत आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट ‘पॉवर पॅक्ड’ असा चित्रपट असेल असं टिझरवरून वाटतंय.

पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचं नवीनच लग्न झालंय. आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. अशात काही काम न करणारा आणि पत्त्यांचा नाद असलेल्या भिका सरलाला पत्त्यात हारून डावावर लावतो अन् सुरू होतो मोठा गेम! पुढे काय होणार हे बघण्यासाठी थिएटरातच जावं लागेल!

टिझरमध्ये कलाकारांची मोठी फौज दिसतेय कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप हे कलाकार टिझरमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’ चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 20 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube