“मोदी अन् फडणवीस मुख्य नदी मी भाजपात..”, माजी आमदार पंडित पाटील भाजपात येताच काय म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या पराभवानंतर आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. महायुतीत इनकमिंग वाढलं आहे. आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंडीत पाटील यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य नदी आहेत. म्हणून मी भाजपात आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी भाजपात प्रवेश केला असे पंडीत पाटील म्हणाले.
शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता मात्र संपला. मागील निवडणुकीत आम्ही तटकरेंना खासदार केले. आघाडीमार्फत खासदार झाले. पण आम्हाला ते विससले. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना भविष्यात काय पद मिळेल पण त्यांनी सांगितले की तुम्ही भाजपात या. तुमच्या ज्ञानाचा आम्हाला फायदाच होईल. आता मी शब्द देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का! माजी नगराध्यक्षांसह 10 जणांच्या हाती कमळ; विखेंची खेळी यशस्वी
शेतकरी कामगार पक्षाने मला संधी दिली, जयंत पाटील यांनी देखील संधी दिली. मी आमदार झाल्यानंतर संपत्ती घट होणारा मी पहिला माणूस असेल. एकही पत्र मी स्वत:च्या स्वार्थासाठी दिलेला नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ठाकरेंचे पीए मिलींद नार्वेकरांना तिकीट दिलं, मग आम्ही तुमच्यासाठी कशासाठी काम करायचं. जुन्या नेत्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले. पण ज्यांनी निवडणूक लढवली नाही ते निर्णय घेतायत अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या वादात पडणं मी योग्य नाही, कारण दोघेही माझे चांगले मित्र आहे असेही पंडित पाटील म्हणाले.