गणशोत्सवात यंदा चार दिवस रात्री बारापर्यंत लाउडस्पीकरचा दणदणाट !
मुंबईः यंदाच्या गणशोत्सवासाठी (Ganesh Festival) गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा तब्बल चार दिवस रात्री बारावाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजविता येणार आहे. पूर्वी केवळ तीनच दिवस रात्री बारापर्यंत परवानगी होती. यंदा त्यात एक दिवस वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुसरा, पाचवा, नववा दिवस व अनंत चतुर्थी या चार दिवसही ही परवानगी असणार आहे. त्यामुळे या दिवस रात्रभर मनसोक्त नाचण्यास मिळणार आहेत.
आगामी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्तच्या आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,’
यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदेंच्या मतदारंसघात खासदार चिखलीकरांचचं वर्चस्व; बाजार समिती निवडणुकीत केलं चीतपट
सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधिकाऱ्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यावर सकारात्मक पद्धतीने मार्ग काढावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यातील सर्वच ठिकाणच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, रस्त्यांची डागडुजी करुन घ्यावी. गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये अडचण येता कामा नये. त्याचबरोबर आगमन व विसर्जन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, रस्त्यात केबल येणार नाही याची दक्षती घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
तर अनेक वर्ष सातत्याने गणेशोत्सवाचे आयोजन करीत असलेल्या मंडळांना एकाचवेळी पाच वर्षांसाठी परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. यावेळी पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे येथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.