मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड तासभर चर्चा
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज रात्री नऊ वाजता अदानी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. सुमारे एक तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंही उपस्थित होत्या.
अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून अदानींवर सातत्याने टीका केली जात आहे. अदानी समूहाला धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाने भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अदानींच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तर आता दुसरीकडे अदानींनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलं नाही.
अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
शरद पवार यांना महाविकास आघाडीचे प्रणते म्हटलं जातं. मात्र आता महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं दिसत आहे. राहुल गांधींकडून गौतम अदानी यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. ठाकरे गटही अदानीविरुध्द आक्रमक झाला आहे. मात्र आता शरद पवार आणि गौतम अदानींची भेट झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वही त्यांनी अदानींचे कौतुक केलं होतं. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. अहमदाबाद येथील अदानी यांच्या घरी ही बैठक झाली.