Download App

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची वाहतुक कोंडी सुटणार, महामार्गावर एक-एक लेन वाढविण्याचा सरकारचा निर्णय

  • Written By: Last Updated:

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai-Pune Expressway) तयार करताना पुढील 25 वर्षांचा विचार करण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार अपघातांच्या चक्रात अडकला आहे. या महामार्गाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ‘MSRDC’ ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रोडवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत वाहनांच्या संख्येत झालेली वाढ आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे आणखी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भविष्यात मुंबईवरुन पुण्याला येणारी आणि पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) त्याचा सविस्तर प्रकल्प (DPR) तयार करेल आणि सध्याचा सहा पदरी द्रुतगती मार्ग आठ-लेन करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च करेल.

Amol Mitkari : ‘ताईंच्या वक्तव्याचं समर्थन पण..,’; सुळेंच्या ‘त्या’ विधानावर मिटकरींनी सांगूनच टाकलं 

देशातला सर्वात पहिला दुतगती महागार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ओळखला जातो. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी एक्स्प्रेस वेची रचना करण्यात आली होती. हा महामार्ग कार्यान्वित होऊन वीस वर्षे उलटली असून या काळात या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची दैनंदिन क्षमता साठ हजारांच्या दरम्यान असताना, सध्या ऐंशी हजारांहून अधिक वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळेच घाटांत अनेकदा वाहतूक कोंडी होते. महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळानेच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू केला आहे. तरीही भविष्यात महामार्गावरील वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघातासंदर्भात ब्लॅक स्पॉटही सापडला आहे. यामध्ये खेड शिवपूरमधील दर्गा फाटा, चेल्लाडी, सारोळा पूल, शिंदेवाडी, पंढरपूर फाटा, पेपर मिल आणि खंडाळा या गावांचा समावेश आहे.

 

Tags

follow us