पोलीस असल्याची बतावणी करून घातला 50 लाखांचा गडा, 5 आरोपींना अटक

Impersonator police robbed 50 lakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्ह्यांच्या आणि फसवणूकींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आताही भुलेश्वरमध्ये तोतया पोलिसांनी (Impersonator police) एका व्यक्तीचे अपहरण (Kidnapping) करून त्याच्याकडील ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला नवी मुंबईत (Navi Mumbai) सोडून पळ काढला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या मदतीने सहा तासांत पुणे, ठाणे आणि सातारा परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली.
जबरदस्त, शानदार ‘या’ संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शनिवारी संध्याकाळी ७ वाजता भुलेश्वर येथील पोपलवाडी तिसरी येथून जात असताना चार जणांनी त्यांना अडवले. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यांचे अपहरण केल्यानंतर, आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडून ५० लाख रुपये असलेली बॅगही हिसकावून घेतली. त्यानंतर, आरोपींनी तक्रारदाराच्या मोबाईल फोनमधील सिम कार्ड काढून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्याच्या कडेला सोडले. तसेच त्यांनी मुंबईला परत आल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
गजाभाऊच्या फटकारानंतर मोहित कंबोज सोशल मीडियावरून गायब? ट्विटर हँडल डिलीट…
दरम्यान, या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी तात्काळ चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि सहाही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. अजय बाळकृष्ण लोखंडे (वय 32, सांगली), रेवणसिद्ध राजाराम जवादे (वय 27, सांगली), सागर दामोदर जाधव (वय 29, सांगली), विकास अंकुश देहळे (वय 38, सांगली) आणि दिलीप काशिनाथ ढेकळे (वय 43, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
या प्रकरणी गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली मोटार, ३९ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेला सुरा पोलिसांना जप्त केलाय.
आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणीत आरोपींकडे कसून चौकशी सुरू करण्यात येत आहे.