मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
BMC Politics : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुका रखडलेल्या आहेत. याचा फायदा घेत शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईत विविध विकासकामांच्या उदघाटनांचा आणि लोकार्पणाचा धडाका लावला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष दिले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थित महापालिका आपल्या ताब्यात ठेवायची आहे. त्यादृष्टीने भाजपने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईत विविध कामांचे लोकार्पण केले आहे. मुंबईत ते ठाणे असा प्रवास आता सिग्नल फ्री असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
नवी मुंबई ते ठाणे प्रवास सुद्धा सिग्नल फ्री
मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील.
सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवीमुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत असे. ही वाहतूकोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे.
उद्धव आणि आदित्य कोणाकोणासमोर रडले… लवकरच गौप्यस्फोट करणार
त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूला करिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.
पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान
सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नुकतेच मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मर्गीकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते.
बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भगात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे.
Letsupp Special : Ajit Pawar यांच्यासोबत किती आमदार? हा आहे आकडा!
प्रकल्पा अंतर्गत बिकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत, तसेच ते पुर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगतीमहामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेक्कर उन्नतमार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.