H3N2 : इन्फ्लुएंझाची धडकी! खोकला, अतिसाराने मुंबईकर वैतागले…

H3N2  : इन्फ्लुएंझाची धडकी! खोकला, अतिसाराने मुंबईकर वैतागले…

नवी मुंबई : कोरोनानंतर देशात आता इन्फ्लूएंझा विषाणूचा कहर वाढल्याचं दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांत या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकात दोघांचा बळी गेलाय. आता नवी मुंबईतही इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे काही रुग्णांना आढळून येत असल्याचं दिसतंय.

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक

नवी मुंबईत राहणाऱ्या वैभव पाटीलला या आजाराची लक्षणे दिसून आली आहे. वैभवने सध्या स्वत:ला विलगीकरण केलं असून डॉक्टरांच्या सल्लानूसार गोळ्या-औषधं घेत आहे. मात्र, अद्याप या रुग्णाला इन्फ्लूएंझा विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे वैभवसारख्या अनेकांना हीच लक्षणे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरणं पसरलंय. वैभव पाटील यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना या विषाणूच्या संसर्गाने त्रास जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.

‘शाखा उध्दवस्त करणार असाल तर….’; राजन विचारेंनी दिला इशारा

कोरानासारखाच हा नवा आजार असल्याने एकंदरीत वातावरण बदलामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळेच ही लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच आवाहन नवी मुंबईतील डॉक्टर अदनान इनामदार यांनी केलं आहे.

ईडीला कोर्टात खेचणार, जेलभरो आंदोलन करणार; छापेमारीच्या टायमिंगवर अंधारे भडकल्या

लक्षणे आढळून आल्यानंतर अनेक रुग्ण क्लिनिकला भेट देऊन डॉक्टरांकडून तपासणी करीत आहेत. दरम्यान, कोरोनासारख्याच या विषाणूचीही लागण होत असल्याने नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन डॉक्टरांकडून केलं जातंय. तर इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे आढळून आल्याने नवी मुंबई प्रशानसाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

नवी मुंबई प्रशासनाकडून या नव्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानतळावर पुन्हा कोरोना तपासणी सुरु केली आहे. यामध्ये नागरिकांना लक्षणे आढळून आल्यास त्यांना तत्काळ विलगीकरण करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube