मुंबईत नोकरीची संधी, पण मराठी माणूस चालणार नाही, पोस्ट व्हायरल, नेटकऱ्यांसह दिग्दर्शकही संतापला

मुंबईत नोकरीची संधी, पण मराठी माणूस चालणार नाही, पोस्ट व्हायरल, नेटकऱ्यांसह दिग्दर्शकही संतापला

Janvi Sarana Viral Post : देशात कधी मराठी माणसांना घर नाकारणे किंवा मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना नोकरी नाकारणे असे अनेक प्रकरण घडत असतात. तर आता अशाच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Social media Viral Post) झाली आहे. या पोस्टमध्ये जानवी सारना (Janvi Sarana) नावाची महिलेनं नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे. मात्र या पोस्टमध्ये नोकरीसाठी ‘मराठी माणूस चालणार नाही’ असं लिहिण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हायरल पोस्टमध्ये जानवी सारना या महिलेनं ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) पदासाठी एक जाहिरात दिली आहे. या पोस्टमध्ये तिने जॉब संदर्भातले सर्व डिटेल्स देखील दिले आहे. कामाचा ठिकाण मुंबई असून निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिवर्ष 4.8 लाखांचा पॅकेज देखील देण्यात येणार असल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. याच बरोबर तिने नोकरीसाठी मराठी माणूस चालणार नाही असंही या पोस्टमध्ये लिहिले आहे. आता या पोस्टवर अनेकजण संताप व्यक्त करत आहे. दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी देखील ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक अक्षय इंडिकर (Akshay Indikar) यांनी ही पोस्ट शहरात करत म्हटले आहे की, मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं? जे राजकीय पक्ष मराठी माणसांना मत मागतात त्यांनी याची जबरी दखल घेल्याची अपेक्षा… तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय ? एवढा तिरस्कार ? शेयर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा. असं दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सर्कस पाहून करिअरची निवड केली, निलेश साबळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

तर दुसरीकडे प्रकरण वाढल्यानंतर संबंधित महिलेनं माफी मागितली आहे. मात्र संबंधित महिलेवर कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube