जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या? मोहित कंबोज याचं खळबळजनक ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. मात्र, अनंत करमुसे प्रकरणात त्यांचे नाव आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही सुरू होती. अनंत करमुसे प्रकरणाच्यावेळी कदम हे आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते. अनंत करमुसे प्रकरणात त्यांचे नाव होते. या प्रकरणात त्यांच्यावर केस देखील सुरू होती.
मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
मोहित कंबोज याचं ट्विट
दरम्यान या प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटने खळबळ माजली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वाद निर्माण होणार, असं दिसत आहे.
कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, “हेडकॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम आज सकाळी मृतावस्थेत सापडले! महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या संरक्षणासाठी ते काम करत होते आणि एका प्रकरणात आरोपी होते. एका हाय प्रोफाइल प्रकरणात वैभव कदम साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड! मी एक्स्पोज करणार.”
This Is Last Post Of Vaibhav Kadam.
Who Is Accused?
Whom System Is Saving?
We Can Let #SushantSinghRajput Happen Again!
Murder Can Not Be Given Face Of Suicide Always.We Have now @mieknathshinde Ji As CM Want FAIR Investigation,Can’t Tolerate High Profile People Escape Always. pic.twitter.com/Cnl6SwhcUC
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 29, 2023
याशिवाय मोहित कंबोज यांनी वैभव कदम यांच्या एका व्हाट्सअप स्टेटसचा फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. यात मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर बोलू नका’, शरद पवारांचे थेट आदेश