Live Blog : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मोदींचे मराठीतून भाषण सुरु

  • Written By: Published:
Live Blog : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मोदींचे मराठीतून भाषण सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड ट्रेनला ग्रीन सिग्नल देतील.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी आज सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे ऑनलाइन उद्घाटनही करतील. यानंतर ते शिवाजी महाराज टर्मिनस येथून आयएनएस शिक्राला जातील. येथून हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळावर पोहचतील. त्यानंतर 4.30 वाजता अल्जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.

 

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Feb 2023 06:00 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोहरा समाजाच्या अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोहरा समाजाच्या अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन
    त्यांनतर पंतप्रधान मोदींकडून या संकुलाची पाहणीही करण्यात आली

  • 10 Feb 2023 04:15 PM (IST)

    इतिहासांत पहिल्यांदाच १० लाख कोटी रूपये फक्त पायाभूत सुविधासाठी

    भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच १० लाख कोटी रूपये फक्त पायाभूत सुविधांसाठी ठेवल्या आहेत. यात रेल्वेचा वाटा अडीच लाख कोटींचा आहे. - मोदी

  • 10 Feb 2023 04:12 PM (IST)

    पंतप्रधान मोदी मराठीमध्ये म्हणाले

    रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे – नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2023 04:10 PM (IST)

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण

  • 10 Feb 2023 04:08 PM (IST)

    पहिल्यांदा एका वेळी दोन रेल्वे सुरु होत आहे. 

    पहिल्यांदा एका वेळी दोन वंदे भारत रेल्वे सुरु होत आहे. यांच्यामुळे आर्थिक केंद्रातून आस्थेच्या केंद्र जोडले जात आहे.

  • 10 Feb 2023 04:06 PM (IST)

    मोदींच्या भाषणाची मराठीतून सुरुवात

    पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी मधून केली आहे.

  • 10 Feb 2023 04:05 PM (IST)

    मुंबई-सोलापूर देशातील ९ वी वंदेभारत रेल्वे

    मुंबई-सोलापूर ही देशातील ९ वी वंदेभारत रेल्वे

  • 10 Feb 2023 04:01 PM (IST)

    मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभ

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभासह इतर प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमास प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित.

  • 10 Feb 2023 03:54 PM (IST)

    तुमच्या आशीर्वादाने सरकार आले - मुख्यमंत्री

    "पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने सहा महिन्यांपूर्वी सरकार स्थापन झाले, हे सामान्यांचे सरकार आहे": मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 10 Feb 2023 03:53 PM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

    पंतप्रधान मोदींकडून 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube