फडणवीस सरकारची आतली बातमी फुटली; मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर

फडणवीस सरकारची आतली बातमी फुटली; मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर

Maharashtra Cabinet Minister List : राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदची शपथ घेतली. यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कोणतं खातं कुणाला मिळणार? अजित पवार आणि शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

महायुती सरकारच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. राज्यात 288 आमदार संख्या आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. अशातच महायुती सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळू शकतं याची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीतील नावं पाहून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजितदादांचं कार्ड अन् १४ आमदार.. २९ महिन्यांत ‘खुर्ची’ फडणवीसांकडे ट्रान्सफर

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. अतुल सावे/देवयानी फरांदे
10. माधुरी मिसाळ
11. चंद्रकांत पाटील
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. जयकुमार रावल

16. राणा जगजिसिंह पाटील

शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. निलेश राणे
6. भरत गोगावले 7. दिपक केसरकर
8. प्रताप सरनाईक
9. तानाजी सावंत
10. राजेश क्षीरसागर
11. आशिष जैस्वाल

12. अमोल खताळ

13. नीलम गोऱ्हे

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. छगन भुजबळ
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मराव बाबा अत्राम
6. धनंजय मुंडे

8. नरहरी झिरवळ

राणे, चव्हाण, फडणवीस अन् शिंदे.. कहाणी चार मुख्यमंत्र्यांच्या डीमोशनची

कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष

राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची (Kalidas Kolambkar) नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन हंगामी विधानसभेच्या अध्यक्षांना शपथ देतील. आज दुपारी एक वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. ९ डिसेंबररोजी नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube