Ashish Sakharkar : मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

Ashish Sakharkar Passes Away : शरीरसौष्ठव क्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचे निधन झाले आहे. साखरकर यांनी जागतिक पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले होते. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर महाराष्ट्र किताब त्यांनी जिंकला होता. आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
साखरकर हे बॉडीबिल्डींग क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चारवेळा मिस्टर इंडिया विनर पुरस्कार पटकावला होता. तसेच चारवेळेस फेडरेशन कप, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य पदक, मिस्टर एशिया सिल्व्हर, युरोपियन चॅम्पियनशीप अशा पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले होते. साखरकर यांचे देशातच नाही तर विदेशातही चाहते होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. आशिष साखरकर यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स सारख्या अनेक खिताबांवर नाव कोरत आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या मराठमोळ्या आशिष साखरकर ह्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांती!— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 19, 2023
साखरकर यांच्या निधनावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स सारख्या अनेक खिताबांवर नाव कोरत आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या मराठमोळ्या आशिष साखरकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.. असे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.
आशिष यांच्या अखेरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर असंख्य चाहते आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली आहे. साखरकर हे मागील काही दिवसांपासून एका आजाराला तोंड देत होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉडीबिल्डींग क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.