‘साती साती पन्नास’ नाटकाचे रविवारपासून प्रयोग; नवोदित कलाकारांना संधी

साती साती पन्नास ह्या महिलांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

Marathi Natak

Mumbai News : नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ने एक मिशन सुरू केलं. सृजन द क्रिएशन ही नवोदित कलाकारांना प्रशिक्षण आणि संधी देण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे. गेली चार वर्षे सातत्याने अनेक एकांकिका, नाटके, अभिवाचने, शॉर्ट फिल्म्स संस्था करत आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवत आहे. ह्या संस्थेतून तयार झालेले कलाकार व्यवसायिक नाटके, मालिका ह्यात स्थिरस्थावर होऊ पाहत आहेत.

Friend Request: धमाल मराठी कॉमेडी नाटक ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ने उडवली खळबळ

यावर्षी सृजन द क्रिएशन ज्येष्ठ लेखक संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित साती साती पन्नास ह्या महिलांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ७ ॲक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे होणार आहेत. या नाटकाचे संगीत आणि गीतगायन श्रद्धा नांदुर्डीकर यांनी केले आहे तर नृत्य सिद्धेश दळवी यांनी बसवली आहेत. श्रद्धा माळवदे , चैताली जोशी, गीता पेडणेकर, अर्चना पाटील, गौरवी भोसले, स्वरांगी जोशी, निनाद चिटणीस या नवोदित कलाकारांच्या अभिनयाने हे नाटक सजलं आहे.

प्रयोगाची तिकीटे प्रयोगाआधी अर्धा तास हॉलवर उपलब्ध होतील. सर्व नाट्य रसिकांनी ह्या प्रयोगांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे यांनी केले आहे.

Prashant Damale : मराठी रंगभूमीसाठी भाग्याचा दिवस, प्रशांत दामलेंना संगीत नाटक अकादमी पुरस्कार 

follow us