वाद पेटला ! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या, शेण फेकले
Uddhav Thackeray Melava in Thane : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भगवा सप्ताह मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम पिच ठाण्यात आज रात्री होत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे लक्ष लागून असताना मनसेच्या सैनिकांनी सभेच्या ठिकाणी मनसेने राडा केलाय. या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बीडमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्यांचा वर्षाव करत विधानसभेला कुणाची सुपारी घेतली, अशा घोषणाही दिल्या होत्या. त्याला आता मनसेने (MNS) ठाण्यामध्ये प्रत्युत्तर दिले आहे. (MNS protest at Uddhav Thackeray’s meeting place in Thane!)
मनोज जरागेंची प्रकृती बिघडली, भाषण करतांना भोवळ, साताऱ्यात नेमकं काय घडलं?
मनसेचे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी टोमॅटो फेकला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होत आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी बांगड्या फेकत आंदोलन सुरू केले. परंतु पोलिसांनी सर्व मनसैनिकांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर काही वेळाने भगवा सप्ताह मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्याला खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. या सभेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेला वळवळ करणाऱ्या सापांना आता विधानसभेला ठेचून काढायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
‘केज’साठी पवारांनी हेरला मुंडेंचाच शिलेदार; प्रवेशाची औपचारिकता बाकी?
बीड येथे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आल्या होत्या. तसेच ताफा अडविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनीही ठाकरेंना जशा तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलाय.
उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले
उद्धव ठाकरे व इतर नेत्यांचा ताफा हा ठाण्याकडे येत होता. त्यावेळी महामार्गावर एक मनसेचा कार्यकर्ता उभा होता. वाहने जात असताना या कार्यकर्त्याने वाहनांवर दगडफेकले. तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेणही फेकले आहेत.