Devendra Fadnavis : ज्यांचे चार खासदार निवडून येतात, त्यांचा धसका कसा? शरद पवारांच्या टिकेवर फडणवीसांचं खरमरीत उत्तर…

Devendra Fadnavis : ज्यांचे चार खासदार निवडून येतात, त्यांचा धसका कसा? शरद पवारांच्या टिकेवर फडणवीसांचं खरमरीत उत्तर…

Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी धसका घेतला त्यामुळे माझ्यावर आरोप केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली चार खासदार निवडून येतात त्यांचा कसा धसका घेतला? असं म्हणणं हास्यास्पद ठरेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीमध्ये आयोजित सभेत त्यांच्यावर केलेल्या टिकेवरुन निशाणा साधला. पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींना देशात काय घडतंय? याचं वास्तव चित्र समजलं पाहिजे. त्यांनी जे काय वक्तव्य केलं, त्याच्यावरुन असं दिसतंय की, त्यांना वास्तविक परिस्थितीची माहिती दिलेली दिसत नाही. आणि वास्तविक परिस्थितीची माहिती न घेता असं वक्तव्य करायला मोठं धाडस लागतं, ते मोदींनी दाखवलं, पण ते सत्यावर आधारीत नव्हतं, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी लगावला.

Nana Patole : मोदी जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा उद्योग घेऊनच गेले; पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप

अनेक राज्यांमध्ये लोक बदलाच्या तयारीत आहेत. जनतेला बदल हवा आहे. आज मोदी किंवा त्यांच्या विचारांचा पक्ष कोणत्या राज्यात आहे? केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हैदराबादमध्ये नाही, गोव्यात नव्हतं पण तिथलं सरकार फोडून त्या ठिकाणी सत्तेवर आले. इथं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून त्यांचं सरकार स्थापन केलं, असा आरोप केला.

शरद पवारांना त्या व्हिडीओबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी त्या व्हिडिओला गांभीर्याने घेत नाही. फडणवीसांकडे 110 आमदार आहेत. त्यांना नजरअंदाज करता येणार नाही. पण माझ्याकडं 110 आमदार असते तर मी सरकार बनवलं असतं. त्यावरुनही फडणवीसांवर टोला लगावला. ते म्हणाले की, हाच फरक शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणार आहे. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. ते त्यांचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील, तसेच त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली चार खासदार निवडून येतात त्यांचा कसा धसका घेतला? असं म्हणणं हास्यास्पद ठरेल, असंही ते म्हणाले त्याचवेळी पवार काय बोलले हे मी ऐकलं नाही त्यांच्यामुळे मी काही बोलणार नाही. असं म्हणत त्यांनी सावरासावर देखील केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज