मुंबई पालिकेचा कारभार भ्रष्ट; कॅगच्या अहवालाने ठाकरेंवर टांगती तलवार
Mumbai : मुंबई महापालिकेच्या (Mumbai) कारभारात पारदर्शकता नाही. निविदा न काढताच कामे दिली गेली आहेत असे गंभीर मुद्दे कॅगच्या अहवालात (CAG Report) नमूद केले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात कॅगच्या अहवालाचे वाचन केले. आमदार अमित साटम यांनी तशी विनंती केली होती. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन फडणवीस यांनी या अहवालात नेमके काय म्हटले आहे हे सभागृहासमोर मांडले.
मुंबई महापालिकेतील या कारभाराप्रकरणी चौकशीचा विचार केला जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा : भ्रष्टाचारमुळे महसूल अधिकारी गर्भश्रीमंत; राष्ट्रवादीच्या आमदाराने विखेंना सुनावले
फडणवीस म्हणाले, हा जो काही अहवाल आहे तो 31 ऑक्टोबर 2022 रोजीच घोषित करण्यात आले होते की महापालिकेचे ऑडिट केले जाईल. त्यानंतर कॅगने ऑडिट केले. हे ऑडिट जवळपास 12 हजार कोटींच्या कामांचे आहे. कोविड काळातल्या कामांचे ऑडिट केलेले नाही तो मुद्दाही विचाराधीन आहे. यामध्ये जर खरेच सरकारने चौकशीचा निर्णय घेतला तर तो ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरणार आहे. कारण, मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या सत्ताकाळातील ही कामे आहेत.
28 नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2022 या काळातील हे ऑडिट आहे.
Mission 150 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी BJPचा मेगा प्लॅन तयार
या अहवालात असे म्हटले आहे की 4755 कोटींची कामे ही कंत्राटदार व बीएमसीत करारच झालेला नाही. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यावर कारवाईचा अधिकार नाही.
3357 कोटींच्या महापालिकेच्या 13 कामांना थर्ड पार्टी ऑडिटर नेमला गेलेला नाही. कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे केलेला वापर यामध्ये दिसून येत असल्याचे कॅगने म्हटले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने सॅप संदर्भात 159 कोटी रुपयांचे कंत्राट कोणतीही निविदा न मागवता जुन्याच कंत्राटदाराला दिले आहे.
54 कोटींची कामे सुद्धा अशाच पद्धतीने निविदा न मागवता जुन्या कामांना जोड म्हणून देण्यात आली. ही कामे सुद्धा एकाच कंत्राटदाराला दिली गेली आहेत, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मालाड पंपिंग स्टेशनमध्ये 464 कोटींचे काम अपात्र निविदाकाराला देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या दोन विभागांची वीस कामे कोणतेही टेंडर न काढता देण्यात आली. या कामांची किंमत साधारण 214 कोटी रुपये आहे.