मुंबईत खळबळ! मिरा रोडवरील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; कसून शोध सुरू

  • Written By: Published:
मुंबईत खळबळ! मिरा रोडवरील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; कसून शोध सुरू

मुंबई : मीरा रोड येथील एका हॉस्पिटलला ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाला आहे. या धमकीनंतर मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे. सुरक्षेसाठी पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये नागरिकांची आवक-जावक थांबवली असून, खरचं हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे का याचा कसून शोध घेतला जात आहे. सध्या तपासासाठी बॉम्बशोधक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलिसांनी दिली आहे. याशिवाय मुंबईमधील ६० हॉस्पिटलला धमकीचे मेल आल्याचेही सांगितले जात आहे.

रूग्ण आणि नातेवाईकांमध्ये दहशतीचे वातावरण 

बॉम्बच्या धमकीनंतर बॉम्ब शोध पथक आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून, धमकी मिळालेल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये कसून तपास केला जात आहे. हे धमकीचे मेल नेमके कुठून आले, कोणी पाठवले धमकी देण्यामागे दहशतवादी संघटनांचा काही हात आहे का? या सर्व बाजूंचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धमकीचमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईतील मोठे आणि नामांकित हॉस्पिटल्स असून, रुग्णालयात स्फोटकं असल्याची माहिती पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आली आहे. श्वान पथकासह पोलिसांच्या इतर पथकाकडून हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले असून, रुग्णांनी आणि नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube