पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO

- मुंबईत आज पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळायली. मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली होती.
- नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
- उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली बांद्रा, गोरेगाव परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे.
- हवामान विभागाने मुंबईत अलर्ट जारी केला आहे.
- दादर, माटुंगा, सायन किंगसर्कल परिसरर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
- मंत्रालय परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते.
- पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील झाला आहे.