धक्कादायक! 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार; थेट पीएम मोदी अन् सीएम योगींना धमकीचा मॅसेज
Threat Message to Modi and Yogi : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक धमकीचा मॅसेज आल्याचं समोर आलं आहे. या मॅसेजमुळे खळबळ निर्माण झाली असून या ही धमकी थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना देण्यात आली आहे. या धमकी देणाऱ्याने 26/11 ला मुंबईवर केलेल्या हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. ( Mumbai’s traffic control room receives Threat Message to PM Modi and CM Yogi )
Priyanka Chopra Birthday: लग्नाअगोदर ‘या’ कलाकारांसोबत जोडलं गेलं देसी गर्लचं नाव!
मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला आलेल्या या धमकीच्या मॅसेजप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धमकीमध्ये केवळ मुंबई शहरच या आरोपींच्या निशीण्यावर नाही. तर थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना ही धमकी देण्यात आली आहे. तसेच या धमकीच्या मॅसेजमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे. की, यासाठी या आरोपींनी काही ठिकाणी कारतूस आणि एके 47 आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतलं आहे. त्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. वरळी पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
Maharashtra | Mumbai's traffic control room receives threat message, threatening that UP CM Yogi Adityanath & PM Modi govt are on target. The accused also threatened to be ready for a 26/11 like terrorist attack. A case under section 509 (2) of the IPC has been registered against…
— ANI (@ANI) July 18, 2023
दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार
दरम्यान अशीच धमकी 9 जुलैला उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली होती. यामध्ये देखील मोदी आणि योगी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये यूपीतील देवरिया जिल्ह्यातील पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतले होते. त्याने मद्यपान करून हा फोन केल्याचं सांगण्यात येत होतं.
ताब्यात घेण्यात आलेला हा आरोपी यूपीच्या गोरखपूर जिल्ह्यातील आहे. त्याचं वय 45 वर्ष असून सुरूवातीला त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून तपास केला असता त्याची खरी ओळख पटली होती. त्याच्याविरोधात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास देवरिया पोलीस करत आहेत. तर हे धमकीचं प्रकरण ताज असताना आता पुन्हा पीएम मोदी अन् सीएम योगींसाठी मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आता तपासात काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.