मुंब्य्राचं वाटोळ करण्यात पालिका अन् पोलीस आयुक्तांचा मोठा हात; आव्हाडांचे गंभीर आरोप

मुंब्य्राचं वाटोळ करण्यात पालिका अन् पोलीस आयुक्तांचा मोठा हात; आव्हाडांचे गंभीर आरोप

Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही. तशी कोणतीही माहीती आम्हाला प्राप्त नाही. अशी घोषणा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री केली. पण, उत्तर प्रदेशमधील अधिकारी यांनी 400 तरूणांचे मुंब्रा येथे धर्मांतर झाले. असा दावा केला त्यामुळे ठाणे पोलिसांची लाज गेली. तसेच यातून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा मोठा कट होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्याने माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ( Ncp Mla Jitendra Awhad angry on Mumbra Conversion Issue of UP Police )

सीएम शिंदेंकडून फडणवीसांना बगल; जाहिरातबाजीवर दरेकर आक्रमक

त्याचबरोबर ते पुढे असं देखील म्हणाले की, राज्य सरकार यांनी गंभीरपणे यावर विचार केला पाहिजे. ठाणे पोलीस यांनी नाराजीचे पत्र पाठवले पाहिजे. हा एक दंगल घडवण्याचा प्रकार होता. शहराला बदनाम करण्याचे काम केल जातं आहे. तसेच मी आमदार झाल्यापासून एकदाही तणाव झालेला नाही. मी मुंब्रा वासियांना आणि कालवाकरांना तळ हातांच्या फोडा सारखे जपत आहे. या संदर्भात गृहमंत्री यांना पात्र लिहिणार आहे. त्यांनी गझियाबाद पोलिसांना समज दिली पाहिजे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी असं देखील म्हटले होते की, मुंब्रा पोलिसांनी हे स्पष्ट करावे की धर्मांतरण झाले आहे की, नाही. जर असे धर्मांतरण झाले असेल तर हा मुंब्रा पोलिसांचा अपमान आहे. की त्यांच्या शहरातील ही धक्कादायक घटना त्यांना माहित नाही.

जमत नसलेलं लग्न अन् उसळलेल्या दंगली… शरद पवारांना धमकी देण्याची कारण ऐकूण पोलिसही चक्रावले

मात्र त्यावर अखेर या दाव्यावर मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही. तशी कोणतीही माहीती आम्हाला प्राप्त नाही. अशी घोषणा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री केली. त्यामुळे तेथेल आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube