Aditya Thackeray, 2024 नंतर तुला आमदार ठेवत नाही ; नितेश राणेंची सटकली
मुंबई : हल्ली तर मोठ्या मोठ्या बाता चालू आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Eknath Shinde) सांगतात की वरळीत येऊन लढा. तुमच्या ठाण्यात येऊन लढतो. तुझा आवाज नीट कर मग आमच्याशी बोलायची हिंमत कर. अजून गळ्याचा कंठ फुटलेला नाही. जोरजोरात बोलायची हिंमत दाखवतोय. तुला 2024 च्या नंतर आमदार ठेवत नाही. त्या गोष्टींची चिंता करु नको, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केला आहे.
कोळी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागला. याची जाणीव मला कोळी बांधवांनी करुन दिली होती. पण आज जो कोळी बांधवांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर प्रेम आणि विश्वास दाखवला आहे तो गेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना आणि स्थानिक आमदार मुलांना मिळवता आला नाही. हे प्रेम मिळवण्यासाठी नशीब आणि कर्तुत्व लागते. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकत आणि हिंमत नाही. आमदारकी फक्त मिरवायला पुरती ठेवली का? असा सवाल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.
मागचं सरकार फक्त फेसबुक आणि ऑनलाईन चालायचं. एकदा कोळी बांधवांच्या प्रश्नांसाठी ऑनलाईन बैठक बोलावली होती. त्या ऑनलाईन बैठकीत तेव्हाचे पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी आणि अधिकारी होते. तेव्हा कोळी बांधवांना त्या बैठकीत बोलू दिले नाही. कोळी बांधवांचे प्रश्न समजूनच घ्यायचे नाहीत फक्त मनमानी कारभार इथल्या आमदाराचा सुरु आहे, अशी टीका नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.