विरोधकांवर तुटून पडणारे नितेश राणे शिंदेंसमोर नरमले? आक्रमक राणेंचा सूर अचानक का बदलला?
Nitesh Rane हे राजकीय मैदानात आपल्या जळजळीत टीकेने समोरच्याला निरुत्तर करतात मात्र यांच्यातील मोठ्या बदलाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत
Nitesh Rane softened in front of Shinde Why did the aggressive Rane’s tone suddenly change : राजकीय मैदानात आपल्या जळजळीत टीकेने समोरच्याला निरुत्तर करणारे भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांच्या वागण्यातील एका मोठ्या बदलाने सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेहमी आक्रमक पवित्रा घेणारे आणि ‘कट्टर’ हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घाम फोडणारे नितेश राणे आता चक्क शिंदे शिवसेनेच्या बाबतीत कमालीचे मवाळ झाले आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या मंत्र्यांवर काही महिन्यांपूर्वी राणे टीका करत होते, त्यांनाच आता ‘शिंदे साहेब’ म्हणून संबोधण्यामागे कोणती राजकीय मजबुरी आहे की हे आगामी सत्तेचे नवे गणित आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अगदी राणे बंधूंमध्येही यावरून मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र, नागपूर अधिवेशनापासून सुरू झालेला हा ‘बदलावाचा वारे’ आता अधिक स्पष्टपणे वाहू लागला आहे. देवेंद्र फडणवीस हे तर त्यांचे नेते आहेतच, पण आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काय सांगता, क्रिकेटमध्ये होणार चक्क 73 नवीन बदल; जाणून घ्या कधी आणि कोणते नियम लागू होणार
हा बदल केवळ महायुतीमधील ‘कंपलशन’ आहे की आगामी निवडणुकांमध्ये आपली जागा सुरक्षित करण्यासाठीची ही रणनीती आहे, यावर आता चर्चा झडू लागल्या आहेत. आक्रमक नितेश राणेंनी आपली तलवार म्यान करणे हा केवळ शांततेचा काळ आहे की वादळापूर्वीची शांतता? या नवीन ‘सॉफ्ट पॉवर’ मुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेतील समन्वय खरंच सुधारणार का, हे पाहणे आता अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे.
