ओवैसींनी रणशिंग फुंकलं! नवी मुंबईत एमआयएमचं अधिवेशन…

ओवैसींनी रणशिंग फुंकलं! नवी मुंबईत एमआयएमचं अधिवेशन…

नवी मुंबई : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी राज्यातील मुस्लिम लोकांना लक्ष्य केलं आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत एमआयएमचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. औवेसी यांच्या या अधिवेशनाच्या घोषनेनंतर त्यानंतर राज्यातल्या इतर पक्षामंध्ये एकच खळबळ उडालीय.

मुस्लिम मतांसाठी असदुद्दीन औवेसी रणनीती आखत असल्याचीह चर्चा रंगली आहे. आगामी मुंबई महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औवेसींकडून घोषणा करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती Devisingh Shekhawat यांचे निधन

मुंबईतील मुंब्रा परिसरात दोन दिवसीय अधिवेशनासह रॅली देखील काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे महाविकास आघाडीसह सत्ताधारी पक्षांमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसतंय. रॅलीनंतर अखेरच्या दिवशी मालाड इथल्या मालवणी इथं सभा पार पडणार आहेस.

Pawan Kheda यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत संजय राऊत; म्हणाले “ईडी आणि सीबीआयचा वापर…”

मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तर मालाड काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत, याच मतदारसंघात औवेसी यांनी रणशिंग फुंकल्याने आता मुस्लिम मतांमध्ये विभाजन होणार असल्याचं भाकीत करण्यात येत आहे. औवेसींच्या या रणनीतीमुळे मुस्लिम मतांच्या विभाजन झाल्यास भाजपला त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होऊ शकतो. त्यासोबतच हिंदु मतांचे ध्रुवीकरणही होईल आणि मविआला फटका बसणार आहे.

Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. राज्यभरातून एमआयएमला 7,37, 888 मते पडली होती. त्यासोबतच एकूण 35 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मागील निवडणूकीत एमआयएमने महाराष्ट्रात 44 जागांवर उमेदवार उभे केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube