मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईमधील विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारंय. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली जाणारंय. याशिवाय वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळं […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार असून मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की “मी […]
पुणे : भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे […]
पुणे : जी-20 (G-20) बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील (Pune) वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची (Shaniwar Wada) भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले.तर, लालमहल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजारातून थोडं बरं वाटल्यानंतर खासदार बापटांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघातील कसबा कार्यालय काल (ता.17 जानेवारी) गाठलं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एक दिवसाच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत आहेत. मुंबई महापालिकेच्या (BMC) विकासकामांचे भूमिपूजन आणि मेट्रो तसेच आरोग्य सेवांचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. मोदींची या जाहीर सभेने महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजवणार हे नक्की. राज्यातील मुंबईसह १५ महापालिकांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. या निवडणुका कधी […]